top of page
Search

दीपाली खेडकर यांच्या शब्दांत...

ॲड. दीपाली रामदास खेडकर यांच्याबद्दल


माहिती आणि शिक्षण या मानवी विकासाच्या दोन प्रमुख बाजू आहेत. त्या मजबूत असतील तर आव्हानांचा सामना

करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये कालानुरूप वृद्धींगत होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठले ना कुठले कौशल्य उपजत असते. या कौशल्याची

जाणीव व्यक्तीला झाली तर सर्वांगीण विकासाचे चक्र गतिमान होते, ही बाब हेरत ॲड. दीपाली रामदास खेडकर समर्पित

वृत्तीने दशकभरापासून सामाजिक सेवेत कार्यरत आहेत.


शिक्षण हे केवळ अर्थाजनाचे साधन नसून, सामाजिक जागृती आणि विकासाची पेरणी करणारी एक संधी आहे. या

संधीतूनच प्रगत व उन्नत समाजनिर्मितीचा प्रकाश तळागाळातल्या समाजघटकांपर्यंत पोहचत असतो


ॲड.खेडकर यांनी आपल्या सामाजिक कार्याचा प्रारंभ मानसिक व कायदेविषयक समुपदेशनातून केला. विविध व्यक्ती आणि संस्थांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पौगंडावस्थेतील विविध समस्यांबाबत त्यांनी तरुणींमध्ये जनजागृती करत त्यांना मार्गदर्शन केले आहे. वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, सायबर

ॲडिक्शन याबद्दलही त्यांनी जनजागृतीपर कार्यक्रम घेत समाजमन बदलण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

आपण समाजाचे काहितरी देणे लागतो,या दायित्व भावनेने त्यांनी आपला सामाजिक कार्याचा वसा अधिक प्रगल्भ आणि व्यापक करण्याचा यशस्वी प्रयत्न आजवर केला

आहे. या प्रयत्नांचेच विस्तृत रुप म्हणजे दीपन्वय फाऊंडेशन होय.


प्रत्येक व्यक्तीतील खास बाब असते. जीवन उत्कर्षाचे साधणारी एक ज्योत असते. अशा अनेक ज्योती एकत्र आल्या तर प्रगती आणि विकासाच्या प्रकाशात प्रत्येक समाजघटक न्हाऊन

निघतील, याच उदात्त विचारातून दीपन्वय हे शिर्षक पुढे आले. त्याला प्रतिष्ठानची जोड देत एक

सजग, समृद्ध आणि सशक्त समाज निर्मितीतून उपेक्षितांना स्वयंप्रकाशित करण्यासाठी ॲड. दीपाली

रामदास खेडकर यांनी टाकलेले पाऊल म्हणजेच दीपन्वय फाऊंडेशन होय.

26 views0 comments

Comments


bottom of page